स्वाभिमानी शेतकरी संघटनाचं चाक बंद आंदोलन

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचली आणि पीक पाहणी केली. बुलढाणा तालुक्यात ओल्या दुष्काळाचा आढावा घेत असताना बुलढाणा विश्राम भवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनाने पत्रकार परिषद आयोजीत केली होती.

नवनिर्वाचीत आमदार देवेंद्र भुयार यांनी ऐतिहासिक आंदोलनाची घोषणा केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या 11 नोव्हेंबरला चाक बंद आंदोलन करणार आहे. हे आंदोलन संपुर्ण राज्यभर करणार असुन राज्यात एकही चाक रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे यावेळी सांगितले आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेऊ. असं देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

 

Source: RNO