आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात राजधानी दिल्लीतील ७ जागांसह ५९ मतदारसंघात रविवारी मतदान होणाराय. या ५९ मतदारसंघापैकी उत्तर प्रदेश, बिहार आणि हरियाणामधील मतदान हे भाजप आणि विरोधी आघाडीच्यादृष्टीनं महत्वाचं ठरणाराय. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरियाणातील सर्व म्हणजे १०, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील सर्व म्हणजे ७ आणि झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार आहे. २०१४ मध्ये या ५९ मतदारसंघापैकी भाजपनं ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा कायम राखण्याचं त्यांच्यापुढं आव्हान असणाराय.
पंतप्रधान पदाचा मार्ग ज्या उत्तरप्रदेशमधून जातो त्या उत्तर प्रदेश मध्ये काय आहे, जनतेचा मूड? हे जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. या ठिकाणी सध्य़ा मतदान सुरु असून त्यांनी मतदारांशी चर्चा करुन त्यांच्या भावना जाणून घेतल्या...
Updated : 12 May 2019 5:50 AM GMT
Next Story