Home > Uncategorized > तीन तलाकचं समर्थन करणाऱ्या महिला दलाल

तीन तलाकचं समर्थन करणाऱ्या महिला दलाल

तीन तलाकचं समर्थन करणाऱ्या महिला दलाल
X

तीन तलाक विधेयकावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्या महिला या विधेयकाचं समर्थन करत आहेत, त्या दलाल असून भाजपचे तळवे चाटणाऱ्या आहेत, अशा शब्दांत आझमी यांनी प्रतिक्रिया दिलीय. ज्या महिला या विधेयकाला बुरखा घालून विरोध करत आहेत पण त्या मुस्लिम नसल्याचं आझमींचं म्हणणं आहे. इस्लाममध्ये तलाक या गोष्टीला नापसंत केलं जातं आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजातील ज्या महिलांचा घटस्फोट होईल, त्यांच्या पुर्नवसनाचं काय, मोदी सरकार या घटस्फोटित महिलांच्या पुर्नवसनाची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केलाय.

Updated : 21 Jun 2019 1:53 PM GMT
Next Story
Share it
Top