Home > Uncategorized > राष्ट्रवादी संसदीय नेतेपदी खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी संसदीय नेतेपदी खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी संसदीय नेतेपदी खासदार सुप्रिया सुळे
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संसदीय गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाची बाजू संसदेत मांडण्याची जबाबदारी सुळे यांच्याकडे आली आहे. सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेल्या आहेत. यापूर्वी त्या राज्यसभेवर निवडल्या गेल्या होत्या. विविध प्रश्न अभ्यासपूर्वक मांडणाऱ्या खासदार म्हणून त्यांची देशपातळीवर ओळख आहे. संसदरत्न यासह विविध पुरस्कार त्यांना संसदेतील कामगिरी केल्याबद्दल मिळाले आहेत.

लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक प्रश्न विचारणे यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. युनिसेफचा पुरस्कार त्यांना अलिकडेच मिळाला आहे. सुळे यांची संसदीय गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी सुळे यांचे अभिनंदन केले.

Updated : 12 Dec 2018 2:08 PM GMT
Next Story
Share it
Top