उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन; २८ विधेयकांवर होणार चर्चा
Max Maharashtra | 16 Jun 2019 2:13 PM GMT
X
X
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर आज (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे सांगितले.
या अधिवेशनात विशेषतः दुष्काळावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून चर्चा होईल. यावेळी १३ नवी विधेयके अधिवेशनात मांडली जातील. एकूण १५ प्रलंबित विधेयकांपैकी १२ विधानसभेत आणि ३ विधानपरिषदेत प्रलंबित आहेत. अशी एकूण २८ विधेयकं या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
दुष्काळाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, सुमारे ४७०० कोटी रुपयांचे थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जमा केले आहे. ३२०० कोटी रुपये विम्याचे अनुदानाचे वाटप सुरु आहे. आवश्यक तेवढ्या चारा छावण्या तयार केल्या आहेत. यामध्ये जनावरांच्या पालनपोषणाचा दर वाढवला टँकरने पाणी पुरवठा केला. तसेच चारा छावणीच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येऊ नये यासाठी जनावरांचे टॅगिंग करण्यात आले. पहिल्यांदाच छोट्या जनावरांसाठीही चारा छावण्यात तयार केल्या, त्या व्यवस्थित सुरु आहेत. तसेच पीएम किसान योजनेंतर्गत १ कोटी २० लाख शेतकऱ्यांना थेट निधी देण्याचा निर्णय झाला आहे.
या अधिवेशनात मराठा आरक्षण, धनगर दिलेली आश्वासनेही अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होतील. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी ज्या समाजांना फसवलं त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाहा हा व्हिडीओ..
Updated : 16 Jun 2019 2:13 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire