शरद पवार देशाच्या प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत – संजय राऊत

Courtesy : Social Media

माननीय शरद पवार हे देशाच्या प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत.  शरद पवारांनी स्वतःच सांगितलेलं आहे की, मी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा येणार नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत ते कोणत्या पदावर असोत किंव्हा नसोत त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच पद लहान आहेत.  ते वेगळ्या पक्षाचे असले तरी ही गोष्ट मान्य करायला मला अजिबात किंतु परंतु वाटत नाही, शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत.

आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल- संजय राऊत

“काल पासून ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्या अफवांचं मूळ आणि त्या अफवांचा कारखाना कुठे आहे याची माझ्याकडे पक्की यादी आहे. २१ तारखेला हे अफवांचे कारखाने बंद झाले” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.