Home > Uncategorized > पीएम-किसान योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का?

पीएम-किसान योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का?

आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल 75 हजार कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेस उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून प्रारंभ होणार आहे.

याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. आणखी एक कोटी शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत या योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी खात्याने दिली.

काय आहे ही योजना

सन २०१९-२०च्या हंगामी अर्थसंकल्पात पीएम-किसान या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत दोन हेक्टर किंवा त्याहून कमी लागवडयोग्य जमीन असलेल्या देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान या योजनेचा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या..या वेळी मॅक्समहाराष्ट्रने शेतकऱ्यांशी साधलेला संवाद पाहा हा व्हिडिओ...

योजनेमुळे गोंधळात अडकलेला शेतकरी

या आर्थिक वर्षापासूनच ही योजना लागू होणार असून मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंतच यातील पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. मात्र या योजनेचा अर्ज करतानाच शेतकऱी वर्ग गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. मॅक्समहाराष्ट्रने या योजनेविषयी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्यांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि त्यात सरकारी योजनेचा गोंधळ सांगितला होता... नेमकं काय म्हणाले होते शेतकरी काय गोंधळ उडाला होता जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ...

वरील व्हिडिओ वरुन हे लक्षात येते की, सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनामध्ये गोंधळ पाहायला मिळतोय. तसेच या आधीही शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरुन चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला होता.

Updated : 24 Feb 2019 5:40 AM GMT
Next Story
Share it
Top