Home > Uncategorized > द्रुतगती मार्गावर अपघातात एक ठार दोन जखमी

द्रुतगती मार्गावर अपघातात एक ठार दोन जखमी

द्रुतगती मार्गावर अपघातात एक ठार दोन जखमी
X

कामशेत : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पिंपळोली गावाच्या हद्दीत किलोमीटर नंबर ६८/४०० मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलर [ क्र. एम एच ४६ ए एफ ०४१० ] ला पाठीमागून कारची [ क्र. एम एच १४ जी एच ८२३९ ] ची चालकाचे वेगात नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला असून वाहन चालक व मागील सीटवर बसलेली महिला गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लोकमान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून द्रुतगती पेट्रोलिंग कर्मचारी यांनी संजय राक्षे, सतीश वाळुंजकर, संतोष वाळुंजकर अपघाताची माहिती यांनी कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून मृत व जखमी नावे व माहिती अद्याप मिळाली नाही.

Updated : 4 Sep 2018 11:56 AM GMT
Next Story
Share it
Top