Home > Uncategorized > आता मोदींना वोट सुद्धा देणार नाही - विश्वास उटगी

आता मोदींना वोट सुद्धा देणार नाही - विश्वास उटगी

आता मोदींना वोट सुद्धा देणार नाही - विश्वास उटगी
X

आपल्या विविध मागण्यांसाठी आज वीज, बँका, महापालिका कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामगार संघटनांनी आज अखिल भारतीय काम बंद आंदोलन मुंबई येथील आझाद मैदान इथं सुरु आहे. 'कामगार कायद्यात होणारे बदल हे कामगार विरोधी आहेत. मेकिन आणि स्टार्टअप इंडियाच्या दृष्टीने मात्र होत काहीच नाही. अर्थव्यवस्थेवर जे काही दुसपरिणाम होत आहेत ते आपण नोटा बंदीनंतर बघितले. त्यानंतर आलेल्या GST ने तर एकूण अर्थव्यवस्थेचा GDP अडीच ते पावणेतीन टक्क्यांनी घसरला आहे. जवळ जवळ १ कोटीच्या आसपास रोजगार गेले आहेत. तसेच ३ लाख उद्योग बंद पडले आहेत. अशा अवस्थेत बेरोजगारी वाढतेय आणि नवीन रोजगार निर्माण होत नाहीत त्यामुळे रोजगार निर्मिती करता सरकार काहीही करत नाहीय आणि रोजगार हिरावून घेण्याचं काम मात्र केलं जात आहे. त्या विरुद्ध हा कामगारांचा एल्गार आहे'. असं बँकिंग क्षेत्रातील तज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितलं.

आजच्या या संपामध्ये इंटक, आयटक, सीटू, एचएमएस, टीयुसीसी, एआययुटीयूसी, एआयसीसीटीयू,सेवा, युटीयूसी, एलपीएफ, राष्ट्रवादी कामगार सेल, श्रमिक एकता महासंघ, अंगणवाडी सेविका, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियन आदी कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.

काय आहेत मागण्या ?

नियमित स्वरूपाच्या कामासाठी कंत्राटी पद्धत बंद करावी.

कंत्राटी कामगारांना कायम करावे.

कामगार कायद्यांमधील कामगार विरोधी बदल रद्द करावेत.

संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, कष्टकरी श्रमिकांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करून निवृत्तीनंतर दरमहा ३००० निवृत्तीवेतन द्यावे.

बोनस, भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी कमाल वेतन मर्यादा रद्द करावी.

खासगीकरण थांबवावे, अंगणवाडी, आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा.

रोजगार निर्मितीसाठी आवश्यक धोरण अवलंबवावे व बेरोजगार भत्त्याचीही तरतूद करावी.

Updated : 8 Jan 2019 1:36 PM GMT
Next Story
Share it
Top