राज्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळं नुकसान झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे, मात्र त्या निधीचं वितरण अजून झालेलं नाही, अशी कबुलीच एकप्रकारे महसुल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
याबाबत आमदार उल्हास पाटील, संजय सावकारे यांनी अतारांकित प्रश्न विचारला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तर दिलं. एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं होतं. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १७ जुलै २०१८ रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार 110 कोटी 9 लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला. मात्र, त्या निधीचं वितरण झालेलं नाही, अशी कबुलीच एकप्रकारे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.
Updated : 17 Jun 2019 8:39 AM GMT
Next Story