Home > Uncategorized > “माझेच प्रश्न अन् माझीच उत्तरं” जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा

“माझेच प्रश्न अन् माझीच उत्तरं” जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा

“माझेच प्रश्न अन् माझीच उत्तरं” जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा
X

१ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ANI या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीवरुन विरोधकांनी मोदींवर चांगलाच निशाणा साधला आहे. मोदींची ही मुलाखत फिक्स असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी "माझेच प्रश्न अन माझीच उत्तरं" असं caption देऊन एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ANI या वृत्त संस्थेला मुलाखत दिली. नरेंद्र मोदी यांची गेल्या चार वर्षांत पंतप्रधान झाल्यापासूनची ANI या वृत्तसंस्थेला दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. आता ही मुलाखत फिक्स होती असे आरोप राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. तसेच या अगोदर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून ही मुलाखत फिक्स असल्याचा आरोप केला होता.

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1080678317978718210

Updated : 3 Jan 2019 6:34 AM GMT
Next Story
Share it
Top