Home > Uncategorized > सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी, संजना सावंत बिनविरोध 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी, संजना सावंत बिनविरोध 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी, संजना सावंत बिनविरोध 
X

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संजना सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज ३ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणुक होती. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या संजना सावंत यांनी अर्ज केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी रणनिती आखत कॉंग्रेस आणि भाजपला माघार घ्यायला भाग पाडल्याने ही निवडणुक बिनविरोध पार पडली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी पिठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. आज जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

रेश्मा सावंत योग्य समन्वय साधणाऱ्या पदाधिकारी

आत्ता पर्यंत रेश्मा सावंत यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्यात योग्य समन्वय साधून चांगला कारभार केला असून त्यांच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेने इस्रो सहल, भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या नावाने शिष्यवृत्ती परीक्षा, एज्युकेशन एक्स्पो असे अनेक उपक्रम राबवले आहेत.

Updated : 3 Jan 2019 1:11 PM GMT
Next Story
Share it
Top