Home > Uncategorized > मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही ‘पाणी बिल’ थकवणाऱ्यांच्या यादीत

मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही ‘पाणी बिल’ थकवणाऱ्यांच्या यादीत

मुख्यमंत्र्यांसह मंत्रीही ‘पाणी बिल’ थकवणाऱ्यांच्या यादीत
X

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानाचे तब्बल ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयांचे पाणी बिल थकले आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचे पाणी बिल थकवणाऱ्यांच्या या यादीत फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे आदी प्रमुख मंत्र्यांचा समावेश आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत हे उघड झाले आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी तसेच सह्याद्री अतिथीगृहावरही मोठी थकबाकी असल्याचे समोर आले आहे. सामान्य मुंबईकराने पाणी किंवा वीज बिल थकवल्यास लागलीच त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना इतकी सूट का, असा सवाल यानिमित्तांन उपस्थित होत आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून आरटीआय अधिकाराअंतर्गत माहिती मागवली होती. या यादीत ७ लाखांहून अधिक रुपयांचे पाणी बिल थकल्याने मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानाला डिफॉल्टरच्या यादीत टाकले आहे.

मंत्री, निवासस्थान आणि पाणी बिलाची थकबाकी

-देवेंद्र फडणवीस- मुख्यमंत्री, ‘ वर्षा’ निवासस्थान एकूण थकबाकी- ७ लाख ४४ हजार ९८१ रुपये

-सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री- ‘देवगिरी’ निवासस्थान एकूण थकबाकी १ लाख ४५ हजार ०५५ रुपये

-विनोद तावडे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री- ‘सेवासदन’ निवासस्थानएकूण थकबाकी- १ लाख ६१ हजार ७१९ रुपये

-पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री, ‘रॉयलस्टोन’ निवासस्थान एकूण थकबाकी- ३५ हजार ०३३ रुपये

-दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान एकूण थकबाकी- १ लाख ०५ हजार ४८४ रुपये

-सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान एकूण थकबाकी- २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, नंदनवन निवासस्थान- एकूण थकबाकी- २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री- जेतवन निवासस्थान एकूण थकबाकी- ६ लाख १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री- मुक्तागिरी निवासस्थान- एकूण थकबाकी- १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थान-एकूण थकबाकी- ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृह एकूण थकबाकी- १२ लाख ०४ हजार ३९० रुपये

-प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री ‘पर्णकुटी’ एकूण थकबाकी रु. १६१७१९/-

-विष्णू सावरा, आदिवासी विकास मंत्री ‘सागर’ एकूण थकबाकी १८२१४१/-

-गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ‘ज्ञानेश्वरी’ एकूण थकबाकी रु. ५९७७८

-गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण जलसंपदा मंत्री ‘शिवनेरी’ एकूण थकबाकी रु. 2023/

-रामदास कदम, पर्यावरण मंत्री ‘शिवगिरी’ एकूण थकबाकी रु. ८९८८/

-डॉ. दीपक सावंत, सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ‘चित्रकुट’ एकूण थकबाकी रु. १५५८५२/

-राजकुमार बडोले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ‘सातपुडा’ एकूण थकबाकी रु. १०६२९६/

-एकनाथ खडसे ‘रामटेक’ एकूण थकबाकी रु. २१८९९८/

-मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा- एकूण थकबाकी रु.१०६८२

-रामराजे निंबाळकर, विधानसभा सभापती ‘अजंथा’ एकूण थकबाकी रु. २९०३२

Updated : 24 Jun 2019 2:08 PM GMT
Next Story
Share it
Top