Home > Uncategorized > भारत-पाकिस्तानमध्ये होऊ दे चर्चा! इम्रान खान यांनी केले ट्विट

भारत-पाकिस्तानमध्ये होऊ दे चर्चा! इम्रान खान यांनी केले ट्विट

भारत-पाकिस्तानमध्ये होऊ दे चर्चा! इम्रान खान यांनी केले ट्विट
X

काश्मीरसह इतर मुद्य्यांवर भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा झाली पाहिजे. मतभेत दूर करण्यासाठी चर्चा पुन्हा सुरु करणे आणि व्यापार वाढविणे आवश्यक आहे, असे ट्विट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना पाठविलेल्या अभिनंदन पत्रात दोन्ही देशांमध्ये चर्चेचा प्रस्ताव असल्याच्या वावड्या सोमवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने उठविल्या होत्या. पुन्हा पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून दोन्ही देशांमध्ये कश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सिद्धू हे तर शांतिदूत

पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची पाठराखण पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. सिद्धू हे शांतिदूत आहेत असे सर्टिफिकेट इम्रान खान यांनी दिले आहे.

Updated : 22 Aug 2018 6:02 AM GMT
Next Story
Share it
Top