Home > Election 2020 > नितीन गडकरींना का आहे पंतप्रधान पदाची संधी?

नितीन गडकरींना का आहे पंतप्रधान पदाची संधी?

नितीन गडकरींना का आहे पंतप्रधान पदाची संधी?
X

नितीन गडकरी हे पंतप्रधान मोदींना पर्याय ठरू शकतात का? अशी चर्चा नेहमी होताना दिसत आहे. जर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर गडकरींचं नाव पुढं येऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला जात असताना भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला २३० पेक्षा कमी जागा मिळाल्या तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी हा चांगला ‘पर्याय’ ठरू शकतो, असं वक्तव्य करत गडकरी यांचे नाव पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी चर्चेत आणलं आहे.

एका मुलाखती दरम्यान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? असा प्रश्न त्यांना विचारला असता सुब्रमण्यम स्वामी यांनी हे सर्व ३०-४० जागा जिंकलेल्या घटक पक्षांवर अवलंबून असेल असं म्हणत या घटक पक्षाने मोदींना नकार दिला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान म्हणून स्वीकारू शकत नाही. भाजपला २२० किंवा २३० आणि ‘एनडीए’च्या घटक पक्षांना ३० अशा २५० जागा आम्हाला हमखास मिळतील. असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आकड्य़ाचे गणित पाहता गडकरी यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून गडकरींचे सर्व पक्षातील नेत्यांशी संबध पाहता गडकरींना पंतप्रधान पदाची संधी मिळून शकते. असा मतप्रवाह पुढे येत आहे.

Updated : 4 May 2019 4:46 AM GMT
Next Story
Share it
Top