महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. हा धक्का दुसरे तिसरं कोणी तर केंद्रातील भाजप सरकारने दिला आहे.
स्वयंपाकाचा अनुदानित गॅसची किंमत पुन्हा वाढली आहे. आज मध्यरात्रीपासून गॅस सिलेंडरची किंमत वाढणार आहे. स्वयंपाकाचा अनुदानित गॅस १.७६ रुपयांनी महाग झाला आहे. याआधीच्या ४९६.२६ रुपयांवरून तो ४९८.०२ रुपये झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यासंदर्भात आज माहिती दिली. गॅस दरवाढीमागे जीएसटी हे कारण असल्याचे देखील इंडियन ऑइलने म्हटले आहे. यापूर्वी गॅसचे दर १ जुलै रोजीच २.७१ रुपयांनी वाढवण्यात आले होते. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये चढउतार केला जात आहे.
Updated : 1 Aug 2018 1:45 PM GMT
Next Story