Home > Uncategorized > सुशीलकुमार शिंदे यांच्या कवितासंग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार

सुशीलकुमार शिंदे यांच्या कवितासंग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार

सुशीलकुमार शिंदे यांच्या कवितासंग्रहाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार
X

देशातील एकूण २३ विविध प्रादेशिक भाषांमधील युवा साहित्यिकांना पुरस्कार घोषित झाले आहेत. मराठी भाषेत सुशीलकुमार शिंदे यांच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' या काव्यसंग्रहाला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच 'जंगल खजिन्याचा शोध' या सलीम मुल्ला यांच्या कादंबरीस बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

युवा पुरस्कारासाठी 23 प्रादेशिक भाषांमधील 11 काव्य संग्रह, 6 लघु कथा, 5 कादंबरी आणि एका समीक्षात्मक पुस्तकाची निवड करण्यात आली. त्यात मराठी साहित्यामधून इंदापूर येथील कवी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. ५० हजार रूपये आणि कांस्यपदक असे पुरस्काराचे स्वरूप असून साहित्य अकादमीच्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

देशातल्या २४ प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद, युवा आणि बालसाहित्य या विभागातल्या उत्कृष्ट साहित्याला १९५५ पासून दरवर्षी साहित्य अकादमीचे पुरस्कार दिले जातात. यंदा २३ भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून मैथिली भाषेतील पुरस्कार लवकरच जाहीर होणार आहे.

Updated : 15 Jun 2019 12:34 PM GMT
Next Story
Share it
Top