Home > Uncategorized > फडणवीसांच्या ‘या’ वाक्यानं डुलक्या घेणारे भाजप कार्यकर्ते जागे झाले

फडणवीसांच्या ‘या’ वाक्यानं डुलक्या घेणारे भाजप कार्यकर्ते जागे झाले

फडणवीसांच्या ‘या’ वाक्यानं डुलक्या घेणारे भाजप कार्यकर्ते जागे झाले
X

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीसाठी राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. अगदी सकाळपासूनच उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी हजेरी लावायला सुरूवात केली होती. दिवसभर इतर नेत्यांची भाषणं झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण सुरू झालं. त्यादरम्यान उपस्थितांमधील अनेकांनी डुलक्या घ्यायला सुरूवात केली. फडणवीस यांच्या या लांबलचक भाषणामध्ये जेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत युतीसंदर्भात वक्तव्यं केलं तेव्हा डुलक्या घेणाऱे कार्यकर्ते, पदाधिकारी ताडकन जागे झाल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली.

पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/223070618639419/

Updated : 28 Jan 2019 2:05 PM GMT
Next Story
Share it
Top