Home > Uncategorized > छगन भुजबळांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल

छगन भुजबळांची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल

मुंबई: राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुजबळ पीएमएलए कोर्टात सुनावणीसाठी जात असताना त्यांच्या छातीत दुखू लागले त्याचबरोबर त्यांना श्वास घेण्यास त्रास होउ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर मेहता हे छगन भुजबळांवर उपचार करीत आहेत. त्याचबरोबर अवश्यक वाटल्यास पुढील उपचारासाठी भुजबळांना लीलावती रुग्णालयामध्ये हलवण्याची शक्यता आहे. यापूर्वीही जेलमध्ये असताना अनेकवेळा त्यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते…

Updated : 6 Aug 2018 1:22 PM GMT
Next Story
Share it
Top