Home > Uncategorized > भाजप नेत्यांनीच बुडविल्या बँका - काँग्रेस

भाजप नेत्यांनीच बुडविल्या बँका - काँग्रेस

भाजप नेत्यांनीच बुडविल्या बँका - काँग्रेस
X

पूनम महाजन यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय.

पूनम महाजन यांनी आपली संपत्ती २००९ साली १२ कोटी दाखवली होती. त्यानंतर २०१४ मध्ये निवडणुक लढताना १०८ कोटी दाखवली. मात्र, २०१९ पूनम महाजन यांची संपत्ती २ कोटी रूपये दाखवली आहे. आज देशात बँकांचे पैसे बुडवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. भाजपाचे अनेक उमेदवार सुद्धा यात आहेत, ज्यांनी बँकांचे पैसे बुडवले आहेत असा आरोप सचिन सावंत यांनी केला

जाणिवपूर्वक बँकांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या यादीत विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची नावं अग्रक्रमावर आहेत. त्याच यादीत पुनम महाजन यांचे नाव आहे. पूनम महाजन यांनी देखील बँकांचे पैसे बुडवले आहेत असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. पूनम महाजन या भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवत आहेत.

या बँकांचे पूनम महाजन यांनी पैसे थकवले

इंडियन ओव्हसिस बँक ११ कोटी ४० लाख

पंजाब नॅशनल बँक ५६ कोटी २५ लाख

एकूण थकबाकी – ६७ कोटी ६५ लाख रूपये

या दोन्ही बँकांनी आता पूनम महाजन यांच्या विरोधात स्वतंत्रपणे दावे दाखल केले आहेत, अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली. कर्ज घेतांना बँका सिबील स्कोर तपासतात. तो किमान ६०० असावा लागतो. मात्र, पूनम यांचा सिबील स्कोर हा ५७० इतका आहे. याचाच अर्थ पूनम या बँकांकडून कर्ज घेण्यास पात्र नाहीत, असा असल्याचं सावंत यांनी सांगितलं. पूनम महाजन यांचं कर्ज माफ करण्याचं काम भाजप सरकारनं केल्याचा दावाही सचिन सावंत यांनी केलाय.

शपथपत्रात पूनम महाजन यांनी लपवली ही माहिती

फिनिक्स ऑटो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा उल्लेख नाही

आद्य कोटक कार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा उल्लेख नाही

आद्य रिअलटर्स आणि इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपनीचा उल्लेख नाही

Updated : 27 April 2019 12:57 PM GMT
Next Story
Share it
Top