Home > Uncategorized > सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर ही बंदी.... सहगलनंतर आता पालेकर

सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर ही बंदी.... सहगलनंतर आता पालेकर

सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपलं भाषण अर्ध्यातच थांबवावं लागल्याचा संतपाजनक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (ता. 9 फेब्रुवारी) नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या कार्यक्रमात पालेकरांचे भाषण सुरु असताना आयोजकांनी त्यांना रोखलं. या ठिकाणी प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होत. त्याती इनसाईड द एम्प्टी बॉक्स या प्रदर्शाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार अमोल पालेकर यांनी हजेरी लावली होती.

नेमकं काय घडलं कार्यक्रमात?

आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एक निर्णयाविरोधात टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली, त्यावेळेस कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना आपले मत मांडण्यापासून रोखले. पालेकरांच्या भाषणादरम्यान, या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखले. इतकंच नाही तर भाषण लवकर संपवण्यासही सांगितले.

पालेकर म्हणाले की, कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले.

सरकारच्या या निर्णयाविरोधात पालेकरांनी आपले परखड मत मांडण्यास सुरुवात करताच, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मॉडरेटरनं त्यांना रोखण्यास सुरुवात केली. मॉडरेटरकडून भाषणात वारंवार अडथळे आणले जात असल्याने अखेर पालेकरांनी त्यांना विचारले की, माझे भाषण मी अर्ध्यातच थांबवावे अशी तुमची इच्छा आहे का? तसेच यावेळी त्यांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या बद्दल जे घडलं आहे तिच परिस्थिती याठिकाणी होत असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकारामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सकडून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Updated : 10 Feb 2019 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top