Home > Uncategorized > अश्विनी बिद्रे हत्या ,चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर

अश्विनी बिद्रे हत्या ,चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर

अश्विनी बिद्रे हत्या ,चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर
X

नवी मुंबईतील सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं. चॅटिंगमधील निव्वळ एका अक्षरावरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर मारेकरी असल्याचं पोलिसांनी शोधून काढल्याचं समोर आलं आहे.

अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरने एक शक्कल लढवली. आपलं 'पोलिसी डोकं' लढवत तो अश्विनी यांच्या मोबाईलवरुन चॅटिंग करत राहिला. मात्र हे चॅटिंगच त्याच्या अंगलट आलं. 'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अश्विनी यांच्या मोबाईलवरुन 'हाऊ आर यू' असा प्रश्न विचारण्यासाठी 'यू' लिहिताना अभय कुरुंदकरने 'वाय' (Y) हे अक्षर वापरलं. हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

अश्विनी 'यू' संबोधण्यासाठी कायम 'U' हे अक्षर लिहित असत, मात्र अचानक चॅटिंगमध्ये आलेलं Y हे अक्षर पोलिसांनी हेरलं.

अभय कुरुंदकर अशाप्रकारे यू म्हणण्यासाठी 'वाय' (Y) हे अक्षर वापरत असे. या गोष्टीचा माग पोलिसांनी काढला आणि मारेकरी जाळ्यात अडकला.

अभय कुरुंदकरचे नातेवाईक, मित्र अशा चार-पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करुन घेतली. यू म्हणण्यासाठी अभय कायम Y वापरत असल्याचा दुजोरा पोलिसांना मिळाला, तर अश्विनी कधीच यू म्हणण्यासाठी Y वापरत नसल्याचंही तिच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांकडून समजलं.

अश्विनी यांच्या मोबाईलवरुन मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण उपचार घेण्यासाठी पाच ते सहा महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार असल्याचा उल्लेख यामध्ये होता.

पोलिसांकडे तांत्रिक पुरावे होतेच, मात्र अश्विनी बेपत्ता झाली, तेव्हाही अभय तिच्यासोबत होता आणि ती जिवंत असल्याचं भासवण्यासाठी तिच्या मोबाईलवरुन चॅटिंग करत राहिला, असं पोलिसांनी सांगितलं.

अभय कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारुन हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकर याने पोलिसांना दिली होती.

Updated : 24 Aug 2018 9:28 AM GMT
Next Story
Share it
Top