एटीएसकडून आणखी एकाला अटक
Max Maharashtra | 7 Sep 2018 6:10 AM GMT
X
X
राज्याच्या दहशतवादी पथकाने आणखी एका तरुणाला अटक केली आहे. जळगाव येथील यावल तालुक्यातील साकळीमधून वासुदेव सूर्यवंशी या तरुणाला पोलीसांनी गुरुवारी अटक केली. गुरुवारी दुपारी दहशतवादी पथकाने त्याच्या घरी धाड घालून तब्बल अडीच तास सूर्यवंशीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरातून संशयास्पद साहित्य जप्त केल्याची माहिती मिळत आहे. सूर्यवंशी हा मूळचा मुक्ताईनगरमधील कर्की या गावातील रहिवासी आहे. तो साकळीत आपल्या मामाकडे राहत होता. त्यांचा गॅरेजचा व्यवसाय असून तो हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. एटीएसने सूर्यवंशीच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. व त्यासाठी एटीएस मुंबईला रवाना झाल्याचे वृत्त आहे.
Updated : 7 Sep 2018 6:10 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire