Home > Election 2020 > आनंदराज आंबेडकर यांनी खरंच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला का?

आनंदराज आंबेडकर यांनी खरंच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला का?

आनंदराज आंबेडकर यांनी खरंच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला का?
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असं वृत्त काही वृत्तसंस्थांनी प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांबद्दलही देखील चर्चा सुरु झाली. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे स्वत: आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

“काँग्रेस प्रवेशाचं वृत्त धांदात खोटे आहे. या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. ज्यांनी ही बातमी दिली, त्यांच्याकडून आंबेडकरी चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेसमध्ये कुठलाही प्रवेश केलेला नाही. या बातमीत कुठलाही तथ्य नाही.”, तसेच, “दिल्लीत आमची ताकद नाही. दिल्लीत आम्ही कुठलाही उमेदवार दिलेला नाही. आम्ही दिल्लीचं युनिटही बरखास्त केलंय. मी गेल्या आठ दिवसापासून मुंबईत आहे, दिल्लीत जायचा प्रश्न नाही.”

असं स्पष्टीकरण आनंदराज आंबेडकर यांनी दिलं आहे.

Updated : 5 May 2019 8:50 AM GMT
Next Story
Share it
Top