Home > Uncategorized > बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसेनेने केले दहन...

बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसेनेने केले दहन...

बीडमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसेनेने केले दहन...
X

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळं माजी उपमुखमंत्री अजित पवार यांच्या पुतळयाचे बीड मध्ये शिवसैनिकांनी दहन केले. या वेळी संतप्त शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी करत, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आल्यास, त्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यासह जाळणार, अशी धमकी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिलीय. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या पुतळ्याला चप्पलेने झोडपून काढत त्यांच्या पुतळयाचे दहन केले.

दरम्यान शिवसैनिकांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर माजी उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी, भ्रष्ट घोटाळेबाज अजित पवारांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याची लायकी नाही, संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळात ढकलण्याचे पाप अजित पवारांनी केले आहे, या पुढे अजित पवारांना माफी नाही. असा इशारा यावेळी दिला. या वेळी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

Updated : 29 Oct 2018 10:02 AM GMT
Next Story
Share it
Top