बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज : मांडा तुमची मतं
X
डॉ. बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त तरुणांमध्ये बाबासाहेबांचे समतावादी विचार रुजावे म्हणुन SWPF या संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा स्फूर्तीतुन उच्चविद्याविभूषित झालेल्या अनेक समाजाभिमुख व्यक्तींनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या प्रामाणिक उद्देश्याने SWPF ही संघटना स्थापन केलेली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीवर आणि इतर अडचणींवर मात करून आपापल्या क्षेत्रात अत्युच्य शिखरावर पोहोचलेले आणि समाजाप्रती असलेली कर्तव्य भावना जोपासत असलेला एक समाजाभिमुख व्यक्तिसमूह आपल्यासारख्या इतर गरजू युवकांना मदत करू इच्छितो. तळागाळातील अनेक तरुणांना या संघटनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करून एक सशक्त समाज निर्मितीच्या उदात्त उद्देशाकरीता हे सर्व लोकं एकत्र आलेले आहेत. या संघटनेत प्रोफेसर्स, इंजिनीअर्स, वकील, डॉक्टर्स, सनदी अधिकारी, एनआरआय प्रोफेशनल्स, पत्रकार आणि विद्यार्थीमित्र देखील बहुसंख्येने आहेत.
UG आणि PG च्याविद्यार्थ्यांकरीता ही निबंध स्पर्धा आहे. हिंदी, मराठी अणि इंग्लिश भाषेत ही स्पर्धा असून तरुण पिढीपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचावेत याकरिता हा उपक्रम घेतला जात आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे
English : Dr. Ambedkar's Vision for Today's Indian Society.
Marathi : बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज
Hindi : बाबासाहब की संकल्पना पर आधारित भारत
निबंध पाठविण्याची शेवटची तारीख १० मे आहे. स्पर्धेतीस विजेत्यांना अनुक्रमे रु.१००००, ७०००, ५००० अणि इतर प्रोत्साहनपर बक्षिसं दिली जाणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन SWPF संस्थेनं केलं आहे.
सविस्तर माहितीसाठी संस्थेच्या फेसबुक पेजला भेट घ्या. संस्थेची वेबसाईट देखील लवकरच सुरु होणार आहे.
For Details Please Visit Our FB Page : https://m.facebook.com/Students-Welfare-Progressive-Front-1344794482232808.