Home > Uncategorized > #मिले_सूर_मेरा_तुम्हारा ट्विटरवर ट्रेन्डींग

#मिले_सूर_मेरा_तुम्हारा ट्विटरवर ट्रेन्डींग

#मिले_सूर_मेरा_तुम्हारा ट्विटरवर ट्रेन्डींग
X

ट्विटर आण इतर सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून समाजात फूट कशी पडेल याचा जास्त विचार होतांना आपल्याला दिसत आहे. जातीय आणि धार्मिक धृविकरणाचं हत्यार म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आगे. मग ते कुणी जाणूनबुजून केलेलं ट्विट असो, सोनू निगमनं केलंल ट्विट असो किंवा मग काश्मिरमध्ये जवानांना होणाऱ्या मारहाणीचा व्हिडीओ असो. धृविकरण करण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते सध्या ट्विटर आणि सोशल मीडियावर केलं जात आहे.

पण, गायक आणि संगीतकार विशाल ददलानीनं देशच सर्व प्रथम आहे. कुणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण एकच आहोत असा संदेश देणारं गाणं गात #मिले_सूर_मेरा_तुम्हारा असं ट्विट केलं आहे. सोमवार रात्रीपासून ट्विटरवर हा ट्रेन्ड सुरू झाला आहे. अनेकांनी त्यासाठी वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्या गाण्याचा आधार घेतला आहे. मिले सुर मेरा तुम्हारा...हे ओरीजनल गाणं सुद्धा अनेकांनी यासाठी ट्विट केलं आहे. धृविकरणाच्या अजेंड्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न काही नेटीझन्सन सुरू केला आहे.

Updated : 18 April 2017 7:36 AM GMT
Next Story
Share it
Top