राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्हा पालक मंत्री विष्णु सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठ पुराव्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी रु.२६२ कोटी खर्चाच्या एकूण १४४ ग्रामीण पेयजल योजना मंजूर झाल्या आहेत.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सवरा यांना पत्राद्वारे कळवले आहे.
सन 2018-19 या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील आराखड्यात या योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.
या योजनांपैकी रु.पाच कोटी पेक्षा जास्त खर्चाच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत, तर, पाच कोटी रुपये पेक्षा कमी खर्चाच्या योजना पालघर जिल्हा परिषदेच्या मार्फत राबविण्यात येणार आहेत.
या मंजुरी बद्दल विष्णु सवरा यांनी समाधान व्यक्त केले असून
या योजनामुळे आदिवासी बहुल अशा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटण्याची अशा व्यक्त केली जात आहे.