Home > Uncategorized > मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी २ लाख झाडांवर कुऱ्हाड

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी २ लाख झाडांवर कुऱ्हाड

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी २ लाख झाडांवर कुऱ्हाड
X

राज्य सरकारमार्फत उभारण्यात येत असलेल्या सुमारे ७०१ किमीच्या प्रस्तावित मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी २ लाख झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या वनसंपदेची बिनधोक तोड करताना सरकारने या मार्गावर पुन्हा ८ लाख झाडे लावणार असल्याचं म्हटलं आहे

नुकताच ३ जून रोजी यासंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला. यावेळी प्रकल्पाच्या मार्गावर २,७६,०५० झाडांची नोंद असल्याच सांगण्यात आले. त्यापैकी १,५३, ७४४ झाडांची तोड़ करण्यात आली. एवढ्या मोठ्या हरितपट्टयावर कुऱ्हाड चालवणारा हा बहुदा पहिलाच प्रकल्प असावा, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने पर्यावरणस्नेहींतून उमटत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने [एमएसआरडीसी] मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी या मार्गावर होणारे वनसंपदेचे नुकसान भरून काढण्यासाठी ८ लाख झाडे पुन्हा लावणार असल्याचे म्हटले आहे.

भारताचे वन्यजीव अभयारण्य, भारतीय जैविक संघटना, वन विभाग सात वर्षांसाठी या झाडांच्या देखभालीचे काम करणार आहे. इंडियन रोड काँग्रेसच्या अटी व नियमांनुसार १ किमीच्या अंतरावर ५८३ झाडे लावणे बंधनकारक आहे. परंतु आम्ही प्रत्येक १ किमी अंतरावर ६५० झाडे लावणार आहोत. पुढच्या पावसाळ्यापर्यंत यासंदर्भात अमंलबजावणी करू. स्थानिक झाडे लावण्याला आमचे प्रधान्य असेल जेणेकरून ही वृक्षसंपदा जगवणे सोपे जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

प्रस्तावित महामार्गासाठी इथल्या हरित पट्ट्याचे होणारे नुकसान सहज भरून निघणारे नाही. झाडे लावल्यानंर त्याचा परिणाम लागलीच जाणवणार नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीनंतर नवीन झाडे लावण्याचा सरकारचा कार्यक्रम असला तरी ८ लाख झाडांसाठी ८ लाख लिटर पाणी कुठून आणणार? यासाठी काही नियोजन आहे का?

-डी स्टॅलिन, वनशक्ती, स्वयंमीसेवी संस्था

प्रस्तावित प्रकल्पासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांवर बेकायदा कुऱ्हाड चालवणे योग्य आहे का? विकास प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे त्यामुळे दूर होतील मात्र पर्यावरणाचा समतोल कसा बिघडेल? यावर कुणीच विचार करताना दिसत नाही.

-झोरू बाथेना, पर्यावरणस्नेही

Updated : 18 Jun 2019 8:31 AM GMT
Next Story
Share it
Top