Home > Uncategorized > 'पोलीस दिदी' करणार विद्यार्थ्यांचे संरक्षण

'पोलीस दिदी' करणार विद्यार्थ्यांचे संरक्षण

पोलीस दिदी करणार विद्यार्थ्यांचे संरक्षण
X

शालेय मुलांवर दिवसेंदिवस लैंगिक शोषणाच्या घटना वाढत चाललेल्या आहे. दिल्लीजवळ गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सात वर्षीय प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर देशातील सर्व शाळेतील मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे शालेय मुलांच्या पालकांच्या मनात धास्ती निर्माण झाली की, आपले मुले शाळेत सुरक्षित नाहीत यामुळे त्यांच्यापुढे मुलांना शाळेत पाठवयाचे की नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी २०१६पासून ‘पोलीस दिदी’ हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांत हे पथक नेमण्यात आले असून त्यामध्ये महिला पोलिस अधिकारी रआणि महिला कर्मचारी यांचा समावेश असतो. आठवड्यातून एकदा विभागातील एखाद्या शाळेस हे पथक भेट देऊन, शाळेतील विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण म्हणजे काय... ते कसे ओळखावे आणि त्यापासून कसा बचाव करावा याचे मार्गदर्शन केले जाते. तसेच या विद्यार्थ्यांना गूड टच आणि बॅड टच याचा अर्थ समाजावून सांगतात. तसेच छेडछाड म्हणजे काय.... आणि ती केली आपण काय करावे हे देखील समजावून सांगितले जाते. शाळेच्या आसपास कुणी एखादी व्यक्ती मोफत काही देत असेल तर त्याची माहिती शाळेतील शिक्षकांना सांगणे किंवा घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींना सांगावे.

वेदिका चंदेलिया या दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीने सांगितले की,शाळेच्या बाहेर एक आईस्क्रीमवाला रोज मुलींना

मोफत आईस्क्रीम देत असे. मात्र मी ते आईस्क्रीम न घेता आमच्या शिक्षकांकडे त्या आईस्क्रीमवाल्याची तक्रार केली.

वेदिकाच्या सावधानतेमुळे त्या आईस्क्रीमवाल्याला आणि आसपासच्या फेरीवाल्यांना ताबडतोब हटविण्यात आले.

शाळेत प्रोजेक्टर लावून मुलांना GOOD TOUCH AND BAD TOUCH यासंदर्भात माहिती दिली जाते आणि सत्यमेव जयते चा एक एपिसोडही दाखवला जातो त्यात आमिर खान हा मुलांना यासंदर्भात माहिती देत असल्यामुळे ही मन लावून ऐकतात. तुम्हांला असे कुणी लोक तुमच्या आसपास आढळले जर त्यांनी तुम्हाला अशाप्रकारे स्पर्श केला तर पोलीस दीदी ला सांगा आणि हेल्प लाईन नंबर १०९८ हा मुलांकडून पाठ करुन घेतला...

या उपक्रमासंदर्भात चेंबूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील अधिक माहिती देताना म्हणाल्या की, गेलं वर्षभर हा उपक्रम चेंबूर पोलीस ठाण्याअंर्तगत राबवित आहोत. चेंबूर पोलीस ठाण्याअंर्तगत १८ शाळा असून गेल्या वर्षभरात प्रत्येक शाळेमध्ये कमीतकमी दोनवेळा मुलांशी संवाद साधला. घटना घडल्यानंतर गुन्हेगाराचा शोध घेण हे आमचे काम आहेच परंतु गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. गेल्या वर्षभराच्या अनुभवात आम्हाला मुलांमध्ये याविषयी चांगली जागृती निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे मुलांच्या मनातली भिती कमी होत चाललीय आणि ते आम्हाला येऊनही सांगतात असे अर्चना पाटील यांनी सांगितले.

मुलांचे लैंगिक शोषण जवळच्याच किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून घडल्याचे पोलिस तपासात आतापर्यंत पुढे आले आहे. म्हणूनच शाळेतील मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तींवर ही मुले निरागसपणे विश्वास ठेवतात. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचे अनेक प्रकरणांतून पुढे आले आहे.

https://youtu.be/R-yzrQzlbkk

Updated : 14 Sep 2017 11:39 AM GMT
Next Story
Share it
Top