परभणी
Max Maharashtra | 16 April 2019 11:33 AM GMT
X
X
४ ) परभणी
संजय जाधव – शिवसेना
राजेश विटेकर – राष्ट्रवादी
परभणी मतदारसंघ हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ. या मतदारसंघावर शिवसेनेने आपला गड राखला आहे. गेल्या निवडणूकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना विजय मिळाला होता. या निवडणूकीतही त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या राजेश विटकर यांनी आव्हान दिले आहे. जाधव यांना स्थानिक आमदारांच्या गटबाजीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासमोर यावेळी अडचणी निर्माण होणार आहेत. या मतदार संघात मराठा समाजापाठोपाठ दलित, मुस्लिम आणि ओबीसी यांची संख्या मोठी आहे. मतदारसंघातील शेतक-यांच्या आत्महत्या, कापसाचे आणि सोयाबीनच्या दराचे प्रश्न तसेच रेल्वेचे जाळे असतानाही कोणताही प्रकल्प येथे आला नसल्याने रोजगाराचे प्रश्न तीव्र आहेत मात्र येथील प्रत्येक निवडणूक ही भावनेच्या मुद्द्य़ावरच लढली गेली आहे. विकासापेक्षा भावनिक आवाहन करूनच मते मिळवण्याचा शिवसेना भाजपाचा प्रयत्न असल्याने या निवडणूकीत त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे रंजक ठरेल.
Updated : 16 April 2019 11:33 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire