सुप्रिया सुळे यांनी WhatsApp ग्रुप वर ची पोस्ट डिलीट का केली ?
X
खासदार सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रसेविका समिती च्या बैठकीतला फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका WhatsApp ग्रुप मध्ये एक वैयक्तिक मत मांडणारी पोस्ट केली. त्याच ग्रुप मध्ये सुनेत्रा पवार ही असल्याचं लक्षात येताच सुप्रिया सुळे यांनी घाईघाईने आपली पोस्ट डिलीट केली.
सुनेत्रा पवार यांच्या कंगना राणावत च्या गृहभेटीवरून वाद निर्माण झाला. या बाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट केलं होतं. सुनेत्रा पवार यांचा बचाव करणारी पोस्ट उपाध्ये यांनी केली होती. केशव उपाध्ये यांचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी एका WhatsApp ग्रुप वर पोस्ट करून वैयक्तिक राजकीय मतप्रदर्शन केलं. भाजप सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ उतरला आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे, यामुळे सुनेत्रा पवारांचीच अडचण वाढणार आहे अशा आशयाची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.
या ग्रुप मध्ये सुनेत्रा पवार ही आहेत. राज्यातील अनेक संपादक, प्रशासकीय अधिकारी या ग्रुप मध्ये आहेत. बहुधा आपण चुकीच्या ग्रुप मध्ये पोस्ट केल्याचं लक्षात आल्या नंतर त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली मात्र त्या आधी अनेकांना ही पोस्ट वाचली ही होती.
नेहमी परिवार आणि राजकारण यांची मर्यादा सांगणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्याकडून WhatsApp ग्रुप मध्ये वैयक्तिक पोस्ट पडल्याने त्यांच्या समर्थकांना ही धक्का बसला आहे...