Home > Top News > Human Life Value विम्यात मानवी जीवनाचे मूल्य म्हणजे काय?

Human Life Value विम्यात मानवी जीवनाचे मूल्य म्हणजे काय?

Human Life Value विम्यात मानवी जीवनाचे मूल्य म्हणजे काय?
X

एखाद्या व्यक्तीचे जीवन पैशाने मोजता येत नाही, पण त्याचे उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याचे आर्थिक मूल्य ठरते,” असे विमा तज्ज्ञांचे मत आहे. विमा क्षेत्रात यालाच मानवी जीवन मूल्य (Human Life Value – HLV) असे म्हटले जाते.

मानवी जीवन मूल्य म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कमाईची व ती कुटुंबासाठी किती वर्षे उपयुक्त ठरणार आहे याची आर्थिक गणना. यावरच त्या व्यक्तीला आवश्यक असलेले जीवन विम्याचे प्रमाण ठरवले जाते.

उदाहरणार्थ, नाशिकमधील ३५ वर्षीय राजेश पाटील हे खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये आहे. घर चालवणे, मुलांचे शिक्षण आणि गृहकर्जाची हप्ते ही त्यांची जबाबदारी आहे. जर पुढील २५ वर्षे ते काम करत राहिले, तर कुटुंबाला त्यांच्याकडून जवळपास १.५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. विमा गणनेनुसार, हेच त्यांचे मानवी जीवन मूल्य ठरते. त्यामुळे राजेश यांनी किमान इतक्या रकमेचा जीवन विमा घेतला तर त्यांच्या अनुपस्थितीतही कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकते.

विमा कंपन्या ग्राहकांचे वय, व्यवसाय, उत्पन्न, खर्च व जबाबदाऱ्या या सर्व बाबींचा विचार करून जीवन मूल्याची गणना करतात. यामुळे योग्य विमा रक्कम निवडणे सोपे जाते.

अनेक लोक फक्त ५ ते १० लाख रुपयांचा विमा घेतात, जो कुटुंबाच्या गरजांसाठी अपुरा ठरतो. “मानवी जीवन मूल्य समजून घेतल्यास योग्य विमा रक्कम निवडता येते आणि भविष्यातील संकटांना तोंड देता येते

मानवी जीवनाचे मूल्य समजून योग्य विमा घेणे हे प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहे,” असे मत विमा क्षेत्रातील तज्ज्ञ नागेश राहेरकर यांनी व्यक्त केले आहे....

Updated : 21 Aug 2025 6:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top