IPO ओव्हरसब्सक्रिप्शन म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर
X
सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर IPO (Initial Public Offerings) येत आहेत. अनेक IPO गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. मात्र, आपण नेहमीच ऐकतो की “हा IPO एवढ्या पटीनं ओव्हरसब्सक्राईब झाला!” तर नेमकं याचा अर्थ काय?
IPO मधील वेगवेगळे कोटे
IPO मध्ये गुंतवणूकदारांसाठी ठराविक कोटे असतात:
QIB (Qualified Institutional Buyers) – मोठ्या आर्थिक संस्था
HNI (High Networth Investors) – मोठे गुंतवणूकदार
Retail Investors – लहान गुंतवणूकदार
प्रत्येक कोट्यासाठी शेअर्सची संख्या निश्चित असते.
सोपं उदाहरण
समजा, एखाद्या कंपनीनं 10 शेअर्ससाठी IPO आणला. त्यात –
5 शेअर्स QIB साठी
2 शेअर्स HNI साठी
3 शेअर्स लहान गुंतवणूकदारांसाठी
आता अर्ज कसे आले ते पाहूया:
QIB कडून 100 अर्ज आले → 100 ÷ 5 = 20 पट सब्सक्रिप्शन
HNI कडून 100 अर्ज आले → 100 ÷ 2 = 50 पट सब्सक्रिप्शन
लहान गुंतवणूकदारांकडून 30 अर्ज आले → 30 ÷ 3 = 10 पट सब्सक्रिप्शन
म्हणजेच, 10 शेअर्ससाठी एकूण 230 अर्ज आले.
230 ÷ 10 = 23 पट IPO ओव्हरसब्सक्राईब झाला!
महत्वाची नोंद
IPO चं सब्सक्रिप्शन हे शेअर्सच्या संख्येवर अवलंबून असतं.
IPO चा आकार (मोठा की लहान) यावर त्याचा परिणाम होत नाही.
एकूणच IPO मध्ये अर्जांची संख्या जास्त आणि उपलब्ध शेअर्स कमी असतील, तर तो IPO ओव्हरसब्सक्राईब होतो.