Home > Top News > कॅश रेशिओ म्हणजे काय ? कंपनीचे आर्थिक सामर्थ्य या रेशिओमुळे कसे समजते जाणून घ्या

कॅश रेशिओ म्हणजे काय ? कंपनीचे आर्थिक सामर्थ्य या रेशिओमुळे कसे समजते जाणून घ्या

What is Cash Ratio? Learn how this ratio can help you understand a company's financial strength.

Cash Ratio,Learn ,ratio ,company,financial strength, MaxMaharashtra , MaxMoney
X

एखाद्या कंपनीच्या खातेवहीत म्हणजेच लेजरमध्ये कॅश रेशिओला (Cash Ratio) विशेष महत्त्व असते. गुंतवणूकदार एखादी कंपनी आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे? याची कल्पना घेण्यासाठी हा रेशिओ पाहतात.

कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणाऱ्या सध्याच्या विक्रीयोग्य मालमत्ता म्हणजेच लिक्विड अॅसेट्समध्ये रोख रक्कम आणि रोकडसदृश्य मालमत्तांचा समावेश होतो. यात तीन महिन्यांच्या आत विक्री होणारे कमर्शियल पेपर, ट्रेझरी बिल्स आणि शॉर्ट-टर्म बाँड्स यांचा समावेश होतो. ही सर्व साधने कंपनीची तातडीने उपलब्ध होणारी संपत्ती मानली जाते.

बँका आणि इतर आर्थिक संस्था कंपनीला कर्ज देताना कॅश रेशिओकडे विशेष लक्ष देतात. कारण कॅश रेशिओवरूनच कंपनीकडे तत्काळ कर्जफेडीसाठी किती रोख क्षमता आहे हे समजू शकते.

कॅश रेशिओ काढण्याचे सूत्र :

कॅश रेशिओ = (एकूण रोख + रोकडसदृश्य मालमत्ता) ÷ सध्याचे एकूण कर्ज

जर एखाद्या कंपनीचा कॅश रेशिओ १ पेक्षा जास्त असेल, तर याचा अर्थ कंपनीकडे सध्याचे कर्ज परतफेड करण्याची पूर्ण क्षमता आहे. उलट रेशिओ १ पेक्षा कमी असल्यास कंपनी आर्थिक संकटात जाऊ शकते.

मात्र, अनेक वेळा कंपन्या मुद्दाम घसारा (Depreciation) दाखवून त्यांचा कॅश रेशिओ कमी असल्याचे दाखवतात. तर काही कंपन्या बॅलन्स शीटमध्ये जास्त कॅश दाखवतात.

फंडामेंटल अॅनालिसिस करताना अनेक आर्थिक सल्लागार कॅश रेशिओला जास्त महत्त्व देत नाहीत. कारण कंपनीकडे असलेली अतिरिक्त रोखरक्कम गुंतवणूकदारांना डिव्हिडंड म्हणून वाटता आली असती किंवा भविष्यातील विस्तारासाठी गुंतवता आली असती. त्यामुळे, जास्त कॅश ही देखील काहीवेळा कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते.

शेवटी, कॅश रेशिओ हा कंपनीच्या आर्थिक आरोग्याचा आरसा आहे. एका विशिष्ट कालावधीत कंपनीच्या रोकडस्थितीत किती सुधारणा होते ? हे पाहण्यासाठी हा रेशिओ उपयुक्त ठरतो.

Updated : 29 Aug 2025 4:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top