Home > Top News > एल्गार परिषद प्रकरण: अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण

एल्गार परिषद प्रकरण: अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण

एल्गार परिषद प्रकरण: अटकेत असणाऱ्या वरवरा राव यांना कोरोनाची लागण
X

एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेले कवी-कार्यकर्ते वरवरा राव यांना कोरोनोची लागण झाली आहे. जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसापुर्वी रुग्णालय प्रशासनाने वरवरा राव यांची कोरोना चाचणी केली होती.

सध्या वरवरा राव याचं वय 81 आहे. त्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या सोमवारी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आजारी असल्या कारणानं तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

त्यांच्यावर कोरेगाव भीमा इथं झालेल्या दंगली प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. या दंगलीला त्यांनी आयोजीत केलेल्या एल्गार परिषदेमुळे प्रोत्साहन मिळाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

सध्या वरवरा राव यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळं कोव्हिड रुग्णालय असलेल्या सेंट जॉर्ज किंवा जीटी रुग्णालयात त्यांना हलवण्यात येण्याची शक्यता आहे.

Updated : 16 July 2020 4:27 PM GMT
Next Story
Share it
Top