Home > Top News > अमेरिकेचा भारताला व्यापार धक्का

अमेरिकेचा भारताला व्यापार धक्का

रशियन तेल खरेदीवरून ट्रम्पकडून भारतावर ५० % टॅरिफ

अमेरिकेचा भारताला व्यापार धक्का
X

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा व्यापारी दबाव आणत एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. भारताने रशियाकडून स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले.

ट्रम्प यांचा निर्णय काय आहे?

ट्रम्प प्रशासनाने आधीपासून असलेल्या २५% आयात शुल्कावर आणखी २५% वाढ केली आहे. त्यामुळे एकूण दर ५०% झाला आहे.

हे शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही कृषी उत्पादने टॅरिफच्या बाहेर ठेवण्यात आली आहेत.

मात्र, हिरा उद्योग, वस्त्रउद्योग, स्टील आणि ऑटो पार्ट्स यावर थेट परिणाम होणार आहे.

भारतीय उद्योगावर काय परिणाम होणार?

या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसणार आहे.

सूरतमधील हिरे कटिंग व पॉलिशिंग केंद्रात हजारो कामगार बेरोजगारीच्या मार्गावर आहेत. आधीच ५०,००० कामगार नोकऱ्या गमावले आहेत.

अमेरिकेला होणारी भारतीय निर्यात २०–३०% पर्यंत कमी होऊ शकते.

जीडीपी वाढीत जवळपास ०.८% घट होण्याचा अंदाज आहे.

निर्यातदारांना मदत करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय “अन्यायकारक आणि राजकीय दबाव” असल्याचे म्हटले.

रशियाकडून तेल खरेदी हा पूर्णपणे आर्थिक व ऊर्जेच्या गरजांचा भाग आहे,असे केंद्र सरकारनेस्पष्ट केलंय. तसेच सरकारने निर्यातदारांना मदत देण्याचे आणि आशिया, आफ्रिका व मध्य-पूर्वेत नवीन बाजारपेठा शोधण्याचे धोरण जाहीर केले आहे.

Updated : 26 Aug 2025 11:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top