Perspective of Journalists : राष्ट्रवादी काँग्रेस नणंद-भावजयच्या हाती ?
राज्यातील नामवंत पत्रकारांच्या नजरेतून भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ? पवार कुटुंबाच पुढचं राजकारण काय असेल ? यासंदर्भात जेष्ठ पत्रकारांच्या नजरेतून आढावा घेणारा संतोष सोनवणे यांचा लेख
X
Deputy Chief Minister Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आता महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. अजित पवारांच्या अचानक एक्झिटने अनेकांच्या मनात प्रश्नांच काहूर मात्र सुरु झालं आहे.
अजित दादांच्या मृत्यूने
राष्ट्रवादी काँग्रेसचं आता काय होणार ?
या दुःखद घटनेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का ?
पवार कुटुंबाचा पुढचा वारस कोण?
महायुतीत अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्री कोण ?
सर्वमान्य पुढचा मराठा नेता कोण ?
असे असंख्य प्रश्न सद्या महाराष्ट्रातील चौकाचौका चर्चा सुरु आहेत या प्रश्नाचे उत्तर आताच मिळणार नसले तरी राज्यातील नामवंत पत्रकारांच्या नजरेतून भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ? पवार कुटुंबाच पुढचं राजकारण काय असेल याचा अंदाज जेष्ठ पत्रकारांच्या नजरेतून घेतलेला हा आढावा....
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची शक्यता
जळगाव येथील राजकीय विश्लेषक दिलीप तिवारी सांगतात की,
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न आहे. राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पण अजितदादा नंतर कोण नेता ? असा विचार इतरांनी केलेला नाही. आज अजित पवार यांच्या काँग्रेसकडे खासदार, आमदार, नगरसेवक असे संख्याबळ आहे. पण पक्ष एकहाती सांभाळेल असा विश्वासू नेता नाही. अजित पवार यांच्या कुटुंबात पार्थ वा सुनेत्रा पवार या पक्ष सांभाळू शकणार नाहीत. दुसरीकडे राज्यात पालिका निवडणुकीतून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नामशेष झाली आहे. मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे नेते तिकडे आहेत. पण त्यांच्या पक्षाकडे खासदार वगळता आमदार, नगरसेवक यांचे संख्याबळ नाही.
या आपत्तीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार का ? हा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण पवार यांनी एकत्र येण्याऐवजी दोन्ही पक्षांचे खासदार, आमदार व इतरांना पुढाकार घेऊन पवार कुटुंबातील कोणाच्यातरी नेतृत्वाचा टिळा कपाळी लावणे गरजेचे आहे. अन्यथा संधीसाधू वृत्तीने बहुतेक जण भाजप - शिंदेसेनेचे सहयोगी होवू शकतील. असे होवू नये म्हणून खासदार - आमदार यांना एकत्र बसून पवारांच्या नव्या वारसाच्या नेतृत्वाचा टिळा लावून राजकारण पुढे सुरू ठेवावे लागेल. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तरी सुप्रिया सुळे त्यांना नेत्या म्हणून चालणार नाहीत.
सुनेत्रा पवारांची निवड केली जाऊ शकते
नागपूर येथील राजकीय विश्लेषक अतुल पेठकर सांगतात की,
अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे सरकारला कोणताही धोका नाही. कारण भाजपा १३२ आणि शिंदेसेनेचे ५७ यांचे संख्याबळ बहुमतापेक्षा जास्त आहे. प्रश्न राष्ट्रवादीचे पुढे काय होईल, हा आहे. पुरोगामी शरद पवारांचे राजकारण वैचारिकृष्ट्या हिंदुत्व आणि भाजपा विरोधी राहिलेले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण तुर्तास तरी शक्य दिसत नाही. प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि यापूर्वीही उपमुख्यमंत्री म्हणून काम केल्यामुळे सध्याच्या घडीला छगन भुजबळ यांचा उपमुख्यमंत्री म्हणून दावा प्रबळ आहे. पण, येत्या काळात हंगामी अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची निवड केली जाऊ शकते.
भावनेच्या आहारी जाऊन व्यवहार करता येत नाही. म्हणून कुटुंब म्हणून एक असले तरी लगेचच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल अशी शक्यता कमीच आहे. तसे प्रयत्न झाल्यास सुप्रिया सुळेंचे नेतृत्व अजित पवार गट स्वीकारेल काय हाही प्रश्न राहील. यात भाजपाचीही भूमिका निर्णायक राहील असे चित्र आहे. सत्तेत राहाण्याची सवय झाल्याने कदाचित काहींची पावले भाजपाकडे वळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या होत्या का? याविषयी महाराष्ट्रात नेहमीच चर्चा होत आलीय, महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीत जवळीक वाढली आहे, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील हेच चित्र पहावयास मिळत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत अर्थात एकत्र लढणार आहेत. राहिला प्रश्न आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे पुढे काय? तर तूर्तास याविषयी भाष्य करणे थोडे घाईचे होईल. कारण एकीकडे पवार कुटुंबीय या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचा पक्ष चिन्हाचा न्यायालयीन लढा सुरू आहे, फारतर या निकालाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे तूर्त काही दिवस वेट अँड वॉच अशी भूमिका घ्यावी लागेल, भविष्यात निकाल काय लागतो त्यावर सगळी राजकीय परिस्थिती अवलंबून आहे, त्यांनतर शरद पवार पुढचे नेतृत्व म्हणून आमदार रोहित पवारांवर जबाबदारी सोपवतील की, वेगळा कुठला निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार.
राष्ट्रवादी पक्ष चिन्हाचा न्यायालयीन निकालावर अवलंबून
जळगावचे राजकीय विश्लेषक विकास भदाणे सांगतात की,
याविषयी महाराष्ट्रात नेहमीच चर्चा होत आलीय, महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादीत जवळीक वाढली आहे, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील हेच चित्र पहावयास मिळत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत अर्थात एकत्र लढणार आहेत. राहिला प्रश्न आता अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे पुढे काय? तर तूर्तास याविषयी भाष्य करणे थोडे घाईचे होईल. कारण एकीकडे पवार कुटुंबीय या धक्क्यातून सावरायला वेळ लागेल, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचा पक्ष चिन्हाचा न्यायालयीन लढा सुरू आहे, फारतर या निकालाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे तूर्त काही दिवस वेट अँड वॉच अशी भूमिका घ्यावी लागेल, भविष्यात निकाल काय लागतो त्यावर सगळी राजकीय परिस्थिती अवलंबून आहे, त्यांनतर शरद पवार पुढचे नेतृत्व म्हणून आमदार रोहित पवारांवर जबाबदारी सोपवतील की, वेगळा कुठला निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार.
शरद पवार संधीचा फायदा घेऊन स्वतःचे स्थान मजबूत करू शकतात..
नागपूरचे राजकीय विश्लेषक विकास वैद्य सांगतात की,
सध्या अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडे सक्षम नेतृत्व दिसत नाही. त्यांच्याकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही पक्ष एकसंध ठेवू शकेल किंवा महायुतीसोबतचे संबंध टिकवून ठेवू शकेल असे दिसत नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास अजितदादांवर होता, आणि तो नेतृत्वाचा गुण इतर कोणामध्येही दिसत नाही. कालच्या दुर्दैवी घटनेनंतर, अनेक कार्यकर्त्यांनी आपण पोरके झाल्याची भावना व्यक्त केली. शरद पवार कदाचित या संधीचा फायदा घेऊन आपले स्थान अधिक मजबूत करू शकतात. तथापि, जे अजितदादांसोबत गेले आहेत, त्यांना वाटते की शरद पवार त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक देतील. जर त्यांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला, तर तो पक्ष आधीच खूप मोठा झाला आहे, त्यामुळे त्यांना कुठे आणि कसे सामावून घेतले जाईल, हा एक मोठा प्रश्न आहे.
सुप्रिया सुळे यांची महत्वाची भूमिका
अमरावती राजकीय विश्लेषक मोहन आटाळकर सांगतात की,
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया काही काळासाठी थांबेल, पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची राहील. असं लोकसत्ता चे जेष्ठ पत्रकार मोहन आटाळकर यांनी व्यक्त केली आहे.
देवेंद्र फडणवीस अजितदादांसोबत काम करताना खूप सहज होते. त्यामुळे, महायुतीमधील समन्वयाची समस्याही मोठी झाली आहे. एकंदरीत, अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन वळण मिळाले आहे. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल घडू शकतात.
Supriya sule, Sunetra Pawar, NCP, Sharad PAwar, Ajit Pawar, Maharashtra, POLITICS, Baramati






