Home > Top News > Live Update : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Maharashtra Politics supreme court – उध्दव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Live Update : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Maharashtra Politics supreme court – उध्दव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Live Update : Uddhav Thackeray vs Eknath Shinde Maharashtra Politics supreme court – उध्दव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू आहे.

लाईव्ह अपडेट्स :

शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

निवडणूक आयोगाला ठोस निर्णय न घेण्याची कोर्टाची सूचना

सत्ता संघर्षाचे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याबाबत सोमवारी निर्णय़ होणार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती नाही

पण आयोगाला ठोस निर्णय घेण्यास कोर्टाची मनाई

निवडणूक आयोगाचे वकील – १०वे परिशिष्ट हा वेगळा मुद्दा आहे, ते अपात्र ठरले तर आमदारकी जाईल पण ते राजकीय पक्ष राहणार आहेत, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत.

निवडणूक आयोगाचे वकील – राजकीय पक्षासंदर्भात एखाद्या गटाने दावा केला असेल तर निवडणूक आयोगाला त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

शिवसेनेचे वकील – ४० आमदार किंवा संसदीय पक्ष मूळ पक्ष असल्या दावा करु शकतो का? ते संसदीय पक्ष आणि राजकीय पक्ष यामध्ये गल्लत करत आहेत

शिवसेनेचे वकील – ५० पैकी ४० आमदार सोबत असल्याचे राजकीय पक्ष असल्याचा त्यांचा दावा आहे. पण ते अपात्र ठरले तर त्यांच्या दाव्याला अर्थ उरणार नाही?

सरन्यायाधीश – समजा दोन गट आहेत आणि ते मूळ पक्ष असल्याचा दावा करत आहेत तर त्यांना राजकीय पक्ष म्हणून ओळख मिळण्य़ासाठी दावा करता येणार नाही का?

शिवसेनेचे वकील – ते सदस्य नाही, आमच्या दृष्टीने ते अपात्र आहेत

सरन्यायाधीश – मि.सिब्बल हे राजकीय पक्षाशी संबंधित प्रकरण आहे, आम्ही निवडणूक आयोगाला रोखू शकतो का?

शिवसेनेचे वकील – हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची गरज नाही

शिंदे गटाचे वकील – आम्ही पक्ष सोडलेला नाही, मग निर्णय कुणाला तरी घ्यायचा आहे, तो कुणी घ्यायचा कोर्ट की विधानसभा अध्यक्ष?

शिंदे गटाचे वकील – एखाद्या कायद्यावरील विधेयकावर मतदान केले आणि सदस्य अपात्र ठरले तर कायदा रद्द करणार का?

शिंदे गटाचे वकील – पूर्वलक्ष्यी प्रभावाने निर्णय लागू करायचा म्हटला तर मोठा गोंधळ निर्माण होईल

सरन्यायाधीश – आपण राजकीय पक्षाकडे दुर्लक्ष करु शकत नाही, हा लोकशाहीसाठी मोठा धोका ठरू शकतो

सरन्यायाधीश – मग पक्षाच्या व्हीपचा उपयोग काय?

शिंदे गटाचे वकील - पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केल्यास १०व्या परिशिष्टाचे उल्लंघन होते का?

शिंदे गटातर्फे हरिश साळवे यांचा युक्तीवाद

सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
Updated : 4 Aug 2022 6:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top