Home > Top News > सचिन वाझेच्या नियुक्तीला शरद पवारांचा होता विरोध, वाझेंच्या पत्रातून बाब उघड

सचिन वाझेच्या नियुक्तीला शरद पवारांचा होता विरोध, वाझेंच्या पत्रातून बाब उघड

सचिन वाझेने घेतलं शरद पवाराचं नाव, एनआयएला लिहिलेल्या पत्रात शरद पवारांच्या नावाचा उल्लेख नक्की काय आहे प्रकरण वाचा...

सचिन वाझेच्या नियुक्तीला शरद पवारांचा होता विरोध, वाझेंच्या पत्रातून बाब उघड
X

एंटीलिया केस आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने NIA कडे मोठा गौप्यस्फोट केला आहे. सचिन वाझेने NIA ला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी त्याला पुन्हा कामावर घेण्यासाठीस २ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यामुळं अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
विशेष बाब म्हणजे मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर सचिन वाझे यांनी आता अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 सचिन वाझे याने NIA ला हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात


'माझ्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला होता आणि ते मला पदावर ठेवण्यास इच्छुक नव्हते, त्यांचं मत बदलण्यासाठी अनिल देशमुख यांनी मला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती'


असं सचिन वाझेने पत्रात म्हटलं आहे.


Updated : 7 April 2021 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top