Home > Top News > Raja Maharaj Singh condolence message : महात्मा गांधींच्या निधनानंतर तत्कालीन राज्यपालांनी काय संदेश पाठवला?

Raja Maharaj Singh condolence message : महात्मा गांधींच्या निधनानंतर तत्कालीन राज्यपालांनी काय संदेश पाठवला?

Raja Maharaj Singh condolence message : महात्मा गांधींच्या निधनानंतर तत्कालीन राज्यपालांनी काय संदेश पाठवला?
X

महात्मा गांधींच्या निधनानंतर राज्यपालांनी या शब्दात व्यक्त केल्या होत्या भावना


दिनांक ३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे वृत्त समजताच तत्कालीन मुंबई प्रांताचे राज्यपाल राजा महाराज सिंह यांनी गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना तार पाठवून आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवल्या होत्या.




“आत्ताच प्राप्त झालेल्या या अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक वृत्ताने संपूर्ण मुंबई प्रांतासह मला प्रचंड धक्का बसला आहे. महात्मा गांधी यांच्या निधनामुळे देशाला झालेल्या अपरिमित हानीमुळे आम्ही शोकाकुल आहोत. कृपया आमच्या सहवेदना स्वीकाराव्या.” — महाराज सिंह

‘Issued’ अशी नोंद असलेल्या या तार संदेशावर ३०.१.१९४८ ही तारीख आहे.

लॉर्ड माउंटबॅटन यांचे प्रत्युत्तर

राज्यपालांच्या शोकसंदेशाला प्रत्युत्तर देताना भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी देखील तार पाठवली: त्यात ते म्हणतात:


“या अपरिमित हानीबद्दल सहवेदना व्यक्त करणाऱ्या आपल्या शोकसंदेशाबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. महात्मा गांधी यांचे वैयक्तिक मित्र असल्यामुळे आपण देखील आमच्या इतकाच हा दुखद आघात तीव्रतेने अनुभवत आहात.”

महात्मा गांधी यांच्या हत्येवर जगभरात कशी प्रतिक्रिया उमटली याचे दर्शन त्या काळच्या वृत्तपत्रांमधून घडते.










Mahatma Gandhi assassination, Mahatma Gandhi death, January 30 1948, Raja Maharaj Singh, Lord Mountbatten


Updated : 30 Jan 2026 11:31 PM IST
author-thhumb

उमेश काशीकर

जनसंपर्क अधिकारी, राजभवन


Next Story
Share it
Top