Home > News Update > रायगड: हरिहरेश्वर सागर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत एके 47..

रायगड: हरिहरेश्वर सागर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत एके 47..

Raigad News LIVE AK-47, Rifles & Bullets Seized From Boat In Raigad

रायगड: हरिहरेश्वर सागर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, बोटीत एके 47..
X


रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे हरिहरेश्वर किनारी दोन अनोळखी बोट आढळून आल्या आहेत. मौजे भरडखोल किनाऱ्यावर या बोट आढळून आल्या असून या बोटीत कोणीही व्यक्ती नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिस या बोटीतील वस्तू , साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. या बोटीत एके 47 सारखी शस्त्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बोटीबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाकडून तटरक्षक दल ( कोस्ट गार्ड ) व एमएमबी यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.. पोलिस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. अनोळखी वस्तू व्यक्तीबाबत तातडीने पोलीस व जिल्हा प्रशासनाला कळवावे असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ . महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे .
Updated : 2022-08-18T16:56:09+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top