मराठा आरक्षण : गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा - प्रकाश आंबेडकर
X
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य पुन्हा एकदा अडचणीत आलं आहेत. राजकारणात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. तरीही मराठा समाज आत्तापर्यंत मागास राहिला. अशी टीका वारंवार केली जाते. हाच धागा पकडत आज प्रकाश आंबेडकरांनी आज मराठा समाजातील गरीब जनतेला साद घातली आहे. महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.
असं म्हणत गरीब मराठा समाजाला श्रीमंत मराठा समाजा विरुद्ध स्वतःच लढा उभारावा राहावं लागेल. असं म्हणत आता गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा वाद निर्माण केला आहे.