Home > News Update > वन नेशन वन हेल्थ कार्ड क्रांतिकारक योजना : नरेंद्र मोदी

वन नेशन वन हेल्थ कार्ड क्रांतिकारक योजना : नरेंद्र मोदी

पंतप्रधानांच्या हस्ते झाले राष्ट्रीय संगणीकरण आरोग्य अभियानाचे उद्घाटन

X

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्थेचा उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने वन नेशन वन हेल्थ कार्ड अशीच एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! (National Digital Health Mission-NDHM) याच योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झाले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगट २०२० रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. सध्या ही योजना देशातील अंदमान-निकोबार, चंदीगढ, दादरा व नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीप या ठिकाणी प्रायोगित तत्वावर राबवली जात आहेत.

केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते. तेव्हा त्या व्यक्तीला फाईल घेऊन जावं लागतं. त्या फाईलमध्ये जुन्या तपासण्यांचे वा आजाराच्या निदानाबद्दलचे रिपोर्टस असतात. याच फाईलचं डिजिटल रुप म्हणजे हे आरोग्य ओळखपत्र असणार आहे. आधार कार्डाप्रमाणे १४ अंकी यूनिक ओळखपत्र नागरिकांना दिलं जाईल अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली.

याच १४ अंकी कार्डमध्ये त्या व्यक्तीच्या आजाराच्या, चाचण्यांच्या आणि उपचाराच्या नोंदी घेतल्या जातील. हे कार्ड केंद्रीय सर्व्हरला जोडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही उपचार घेण्यासाठी गेल्यास मागील रिपोर्टस दाखवण्यासाठी या कार्ड गरजेचं ठरणार आहे. या कार्डावरील क्रमांकावरून डॉक्टरांना लगेच तुमच्या जुन्या आजारांविषयी वा हेल्थ हिस्ट्रीबद्दल माहिती कळेल.

हेल्थ कार्ड कसं बनवायचं?

- https://healthid.ndhm.gov.in/register या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचं हेल्थ कार्ड स्वतः बनवू शकता.

- त्याचबरोबर गुगल प्ले स्टोअरवर NDHM हेल्थ रेकॉर्ड अॅपही उपलब्ध आहे. त्या अॅपच्या माध्यमातून आपण हेल्थ कार्डसाठी नोंदणी करु शकता.

- याशिवाय सरकारी वा खासगी रुग्णालये, कम्युनिटी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सेवा केंद्रावर जाऊनही हे कार्ड बनवू शकता.


कार्ड बनवण्याच्या सहा स्टेप्स

- सर्वात आधी https://healthid.ndhm.gov.in/register या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर जा.

- आधारच्या मदतीने ओळखपत्र काढण्यासाठी सर्वात आधी 'जनरेट व्हाया आधार' यावर क्लिक करा.

- तुम्हाला मोबाईल क्रमांकावरून हेल्थ कार्ड काढायचं असेल तर जनरेट व्हाया मोबाईल यावर क्लिक करा.

- आधार वा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो टाका.

- आता एक फॉर्म ओपन होईल. त्यात विचारण्यात आलेली सर्व माहिती कागदपत्रांच्या आधारे भरा.

- ही माहिती भरल्यानंतर सबमिट म्हणा. त्यानंतर तुमचं ओळखपत्र तयार होईल.

- यासाठी दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. एक म्हणजे आधार कार्ड किंवा मोबाईल. दुसरी म्हणजे नाव, जन्म वर्ष, लिंग, पत्ता यासारखी महत्त्वाची माहिती भरावी लागेल. यासाठी कसलीही कागदपत्रं जमा करावी लागणार नाही.

या कार्डमुळे काय फायदा होणार?

- तुमचं १४ क्रमांकाने ओळखपत्र तयार झाल्यानंतर त्यावर तुमच्या आरोग्याशी संबंधित माहिती नोंदवली जाईल. म्हणजेच तुमची हेल्थ हिस्ट्री त्यात जमा होत राहणार. जेव्हा केव्हा तुम्ही रुग्णालयात जाल, तेव्हा फक्त हे कार्ड घेऊन जावं लागणार.

- या कार्डमुळे डॉक्टरांना तुमच्याबद्दलची पूर्वीच्या आजारांविषयीची, तुम्ही घेतलेल्या उपचारांविषयीची, तसेच तुम्हाला असलेल्या इतर व्याधींची माहिती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

- हे ओळखपत्र दाखवल्यानंतर डॉक्टरांना तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्यांची माहिती मिळणं सोप्प होईल. त्यामुळे नव्याने आजाराचं निदान करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या करण्याची गरज पडणार नाही. तसेच त्यातून पैसेही वाचतील.

Updated : 27 Sep 2021 6:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top