Home > Top News > मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू १० जखमी

मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू १० जखमी

मुंबईत पुन्हा इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू १० जखमी
X

मुंबईत पुन्हा एकदा इमारत दुर्घटनेमध्ये आणखी ३ जणांचा बळी गेला आहे. शुक्रवारी पहाटे शिवाजी नगर, गोवंडी परिसरात दुमजली इमारत कोसळली. पहाटे ५ वाजता ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 7 जणांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये तर तिघांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे गेल्या आठड्यात चेंबुर आणि घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये २५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात आता या दुर्घटनेतील मृतांची भर पडली आहे.

Updated : 23 July 2021 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top