Home > Top News > Parali : टीका करणाऱ्यांना परळीच्या मायबाप जनतेने धडा शिकवला – धनंजय मुंडे

Parali : टीका करणाऱ्यांना परळीच्या मायबाप जनतेने धडा शिकवला – धनंजय मुंडे

Parali : टीका करणाऱ्यांना परळीच्या मायबाप जनतेने धडा शिकवला – धनंजय मुंडे
X

परळी | बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने विश्वास दाखविल्यानंतर माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली, त्या सर्वांना परळीच्या मायबाप जनतेने योग्य धडा शिकवला आहे,” असं स्पष्ट मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं.

नगरपरिषद निवडणुकीत परळी वैद्यनाथ (जि. बीड) आणि गंगाखेड (जि. परभणी) या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला असून, या निवडणुकांची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे होती. त्यांनी या दोन्ही निवडणुकांत सक्रिय प्रचार केला होता.

या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत जनतेचे आभार मानले. “न्यायालयाच्या निकालात निर्दोष आणि विजयी ठरलो आहे. तसेच जनतेच्या न्यायालयातही मी विजयी ठरलो आहे. माझ्या मायबाप जनतेचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार,” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या निकालांमुळे परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, जनतेने दिलेला हा कौल विरोधकांसाठी स्पष्ट संदेश असल्याचं मानलं जात आहे.

Updated : 21 Dec 2025 4:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top