Home > Top News > आता २४ रूपयांपासून आयटीआर फाईल करता येणार

आता २४ रूपयांपासून आयटीआर फाईल करता येणार

आयटीआर आणि कर नियोजनासाठी जिओ फायनान्स आणि टॅक्स बड्डीमध्ये सामंजस्य करार

आता २४ रूपयांपासून आयटीआर फाईल करता येणार
X

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने (JFSL) JioFinance अ‍ॅपवर कर नियोजन आणि कर भरण्याचे नवे मॉड्यूल सादर केले आहे. हे फिचर भारतातील करदात्यांना योग्य कर प्रणाली निवडण्यासाठी आणि जास्तीत जास्त वजावट मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करणार आहे.

हे मॉड्यूल TaxBuddy या ऑनलाईन कर भरणा आणि सल्ला सेवा देणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.

या भागीदारीमुळे नवीन सेवा कर नियोजन आणि उत्पन्नकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि परवडणारी बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

दोन मुख्य वैशिष्ट्ये

टॅक्स प्लॅनर – वैयक्तिक वजावट मॅपिंग, हाऊसिंग रेंट अलाउन्स (HRA) मूल्यांकन आणि जुन्या-नव्या कर प्रणालींची तुलना करून भविष्यातील कर देयक कमी करण्यास मदत करते.

टॅक्स फायलिंग – जुनी आणि नवीन कर प्रणाली यांतील गोंधळ दूर करते, 80C आणि 80D सारख्या कलमांखालील वजावट चुकू देत नाही, तसेच महागड्या मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करते. वापरकर्ते स्वतः रिटर्न भरू शकतात किंवा तज्ज्ञ-सहाय्यित पर्याय निवडू शकतात. स्वत: रिटर्न भरल्यास फक्त २४ रुपयांचा खर्च येतो तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन रिटर्न भरल्यास ९९९ रुपयांपर्यंत खर्च येतो.

“कर भरण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने, लोक कर भरण्याशी जोडत असलेली गुंतागुंत दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच, ग्राहकांना प्रभावी कर नियोजन सेवा देऊन त्यांना संपूर्ण आर्थिक वर्षभर त्यांचे कर देयक अधिक चांगल्या प्रकारे नियोजित आणि नियंत्रित करण्यास सक्षम बनवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे,अशी माहिती JFSL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया यांनी दिलीय.

Updated : 13 Aug 2025 5:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top