मुच्युअल फंड गुंतवणूक – ट्रॅक रेकॉर्ड कसा तपासावा?
X
सध्या अनेक गुंतवणूकदार SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड.
शार्प रेशिओ (Sharpe Ratio)
हा रिस्क अॅडजेस्टेड रिटर्न दाखवतो.
म्हणजेच फंड किती रिस्क घेतो आणि त्या रिस्कच्या तुलनेत किती परतावा देतो हे कळतं.
शार्प रेशिओ जितका जास्त, तितका फंड चांगला.
पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशिओ
फंड मॅनेजर किती वेळा शेअर्सची खरेदी-विक्री करतो याचं मोजमाप.
सतत खरेदी-विक्री करणं म्हणजे जास्त खर्च आणि कमी परतावा मिळण्याची शक्यता.
कमी टर्नओव्हर रेशिओ असलेले फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगले मानले जातात.
रोलिंग रिटर्न्स
गेल्या काही वर्षांत फंडाची सातत्यपूर्ण कामगिरी तपासण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो.
उदाहरणार्थ, ५ वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड बघून प्रत्येक महिन्यात किती रिटर्न मिळाला हे समजू शकतं.
स्थिर आणि सातत्यपूर्ण रिटर्न असलेले फंड चांगले मानले जातात.
मॅक्स मनीचा सल्ला
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी फंडाचा शार्प रेशिओ, टर्नओव्हर रेशिओ आणि रोलिंग रिटर्न्स नक्की तपासा. आणि हो, आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.