जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांत 20 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात
X
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
राज्यभरात या निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
सुत्राच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदांच्या 731 जागांसाठी तब्बल 7 हजार 695 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
तर दुसरीकडे,पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी 13 हजार 23 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
एकूणच या निवडणुकांमध्ये सुमारे 20 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापले आहे. स्थानिक विकास,सत्तासमीकरणे आणि पक्षीय ताकद यांची खरी कसोटी या निवडणुकांत पाहायला मिळणार आहे.
आता उमेदवारांची अंतिम यादी,प्रचाराची दिशा आणि संभाव्य राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






