Home > Top News > MaxMaharashtraImpact:दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठणार

MaxMaharashtraImpact:दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठणार

रस्ता बंद केल्यामुळे झालेली दलित वस्तीची नाकेबंदी ऐकोणीस दिवसाच्या ठिय्या आंदोलनानेही उठत नव्हती. MaxMaharashtra ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर अखेर जिल्हा परीषद बांधकाम विभागानं आज पाहणी करुन उद्या ता.२२ पासून दलितासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.

MaxMaharashtraImpact:दलित वस्तीची नाकेबंदी अखेर उठणार
X

रस्ता बंद केल्यामुळे झालेली दलित वस्तीची नाकेबंदी ऐकोणीस दिवसाच्या ठिय्या आंदोलनानेही उठत नव्हती. MaxMaharashtra ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर अखेर जिल्हा परीषद बांधकाम विभागानं आज पाहणी करुन उद्या ता.२२ पासून दलितासाठी रस्ता खुला करण्याचे आदेश जारी केले आहेत.

जांबुड ता. माळशिरस जि. सोलापूर मधे अनेक वर्षांपासून येथील दलित वस्तीच्या रस्त्याचा प्रश्न रखडला होता. जांबुड गावातील ग्रामीण मार्ग 98 ते चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग 448 जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून तो 464 मीटर आहे.तो लवकर दुरुस्त करण्यात यावा.रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असताना काही शेतकरी रस्त्याच्या कामात अडवणूक करीत असल्याने पोलीस बंदोबस्तात रस्ता दुरुस्त करण्याची नागरीकांची मागणी होती.

जांबुड ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या १९ दिवसापासून भीमराव चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, सागर चंदनशिवे व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

ट्विटरच्या माध्यमातून गावकऱ्यांनी याबाबतची माहीती MaxMaharashtra कडे पोचवली होती.





Max Maharashtra च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात जाऊन गावकऱ्यांच्या व्यथा समजावून घेतल्या. त्यानंतर Max Maharashtra ने या संबधीचा रिपोर्ट प्रसिध्द केला.

https://www.maxmaharashtra.com/max-reports/vilaagers-protesting-from-last-16-days-for-road-1099309

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर आज ता.२१ जानेवारी रोजी माळशिरस बांधकाम उपविभागाचे उपाभियंता अशोकराव रणवरे शाखा अभियंता व्ही. एस. भूमकर. ग्रामसेवक प्रतिभा पवार व सरपंच अविनाश खरात, उपसरपंच महावीर माने सदस्य राजकुमार बाबर, प्रकाश गुळमकर. यांनी चंदनशिवे वस्तीवरील रस्त्याची पहाणी करून सदरचा रस्ता दिनांक 22जानेवारी रोजी ग्रामपंचायत मालकीचा रस्ता चालु करण्याचा निर्णय घेतला आहे.



चंदनशिवे वस्तीवरील नागरिकाकडून ग्रामपंचायतीने 29 हजार 852 रुपये भरून घेतले असल्याचे आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले.आम्ही दलित,मागासवर्गीय असल्याने जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत निवेदन घेण्यास नकार देत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी केला होता. सदरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता.परंतु सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याचे कारण देत निधी रद्द करण्यात आला.ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्त करून देतो असे कळविले आहे.त्यासाठी ईस्टीमेट बदलून घ्यावे लागेल.असे सांगितले गेले.त्यानंतरही रस्ता दुरुस्त केला गेला नाही, असे आंदोलनकर्ते ग्रामस्थांचे म्हणने होतं.




बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. आज रस्ता पहाणी करण्यासाठी ओढ्यातून येताना सर्व अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.तर चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांना दररोजचे दळण वळण करण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत असेल याचा विचारही करणे अवघड आहे. जसा ग्रामपंचायत मालकीचा रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय जांबूड ग्रामपंचायतीने घेतला तसाच निर्णय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन जिल्हा परिषद मालकीचा ग्रामीण मार्ग 448 रस्ता दुरुस्त करण्यात घ्यावा व नागरिकांचे रस्त्यासाठी होणारे हाल थांबवण्यात यावेत अशी नागरिकांची मागणी आहे, असे भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले. जोपर्यंत काम प्रत्यक्षात सुरु होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार असेही आंदोलनकारी ग्रामस्थांनी म्हटले आहे. Max Maharashtra नं दलित वस्तीच्या रस्त्यांचा प्रश्न मांडून न्याय दिल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Updated : 21 Jan 2022 2:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top